मद्रास
मद्रास : भारताच्या तमिळनाडू राज्याची राजधानी आणि देशा- तील कोरोमंडल किनार्यावरील (पूर्व) एक महत्त्वाचे कृत्रिम बंदर, लोकसंख्येच्या दृष्टीने कलकत्ता, मुंबई व नवी दिल्ली यांच्यानंतरचे हे चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. लोकसंख्या ३२,६६,०३४; उपनगरां- सह ४२,७६,६३५ (१९८१). क्षेत्रफळ १३० चौ. किमी. मद्रास हे रुंदमापी व अरुंदमापी लोहमार्ग, रस्ते व हवाईमार्ग यांनी देशातील अन्य भागांशी जोडलेले आहे.